मर्कझमध्ये 13,700 भारतीय सहभागी झाल्याचे उघड

0
126

दिल्लीतील निझामुद्दीनच्या तबलिगी जमातीच्या मर्कझमध्ये देशभरातील तब्बल 13,702 लोक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती आंध्रप्रदेश पोलिसांनी दिली आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी ही संख्या मोबाइल टॉवरद्वारे प्राप्त केलेल्या विस्तृत विश्लेषणाच्या आधारे काढली. एवढ्या मोठ्या संख्येमुळे आता चिंता वाढली असून हे लोक आणखी किती लोकांच्या संपर्कात आले असतील याचा शोध सुरू आहे. त्याचप्रमाणे या 13 हजार लोकांना शोधून त्यांना 14 दिवस विलगीकरणात ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
या 13,702 लोकांची राज्यवार यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, झारखंड, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यातील लोक जास्त संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे या राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.