आज दि. ३१पासून राज्यात मच्छिमारी बंदीचा हंगाम सुरू होत असून नियमांचे उल्लंघन करून मासे मारण्यासाठी समुद्रात उतरणार्या ट्रॉलरवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्याचे मच्छीमारी खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले.
जून ते जुलै या दोन महिन्यांच्या काळात मासे अंडी घालण्यासाठी किनार्यालगत येतात. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून या काळात मासेमारीवर बंदी घालणे महत्वाचे असते. मच्छिमारांनी सरकारच्या या निर्णयास सहकार्य करावे, असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मासेमारी बंदीचा काळ ६० दिवस करण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता. परंतु मच्छिमारांनी त्यास विरोध करून तो ४५ दिवसच असावा यासाठी आग्रह धरला, त्यामुळे सरकारने १५ जून ते ३१ जुलै पर्यंतच मासेमारी बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.
आजपासून राज्यातील ट्रॉलर किनार्यावर लावून त्यांची देखभाल करण्याचे कामही सुरू होईल. या काळात समुद्रही खवळलेला असतो. त्यामुळे ट्रॉलर खोल समुद्रात उतरविणे शक्य नसते.