प्रचारकाळात गोमंतकीय जनतेने पक्षांचे कार्यकर्ते, पत्रकार यांनी चांगले सहकार्य दिले. भाजपने अत्यंत शांततेच्या मार्गाने प्रचार केला. कॉंग्रेसने वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून मतदारांना, कार्यकर्त्यांना चिथावण्याचे प्रयत्न केले. परंतु जनता बळी पडली नाही, असे नाईक यांनी सांगितले.
गोव्याला भाजपच स्वच्छ प्रशासन देईल याबद्दल जनतेच्या मनात विश्वास आहे. त्या विश्वासाला भाजप तडा जाऊ देणार नाही, असे नाईक यांनी सांगितले. साखळी येथे प्रधानमंत्र्यांच्या सभेचेही कॉंग्रेसला योग्य प्रकारे आयोजन करता आले नाही, ते या राज्याला प्रशासन कसे देणार, असा प्रश्न नाईक यांनी केला.