भाजपकडून 189 उमेदवार जाहीर

0
9

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री 189 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात केवळ 8 महिला आहेत. या उमेदवारांपैकी 32 ओबीसी, 30 एससी, 16 एसटी समुदायातील आणि 5 वकील आहेत. तसेच नव्या 189 उमेदवारांमध्ये नवे 52 चेहरे आहेत. मुख्यमंत्री बसवराव बोम्मई शिगगावमधून निवडणूक लढवणार आहेत.

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेच्या 224 जागांवर निवडणूक होणार आहे. 13 मे रोजी निकाल लागणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उमेदवारांची यादी जाहीर करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पक्षाने नव्या पिढीला राजकारणात संधी दिली आहे. पक्ष उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर करणार आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा मुलगा बीवाय विजयेंद्र आपल्या वडिलांच्या शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी त्यांच्या पारंपरिक चिकमंगळूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपमध्ये बंडखोरी
भाजपचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ते नाराज झाले असून, त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांचे मन वळविले जाईल, असे पक्षाने म्हटले आहे.