बसची धडक बसून सायकलवरील महिला ठार

0
22

भरधाव निघालेल्या बसने सायकलस्वाराला धडक दिल्याने सायकलच्या मागे बसलेली रेखादेवी मली (३२) ही विवाहित महिला जागच्या जागी ठार झाली, तर तिचा पती शंबो मली (४०) जखमी झाला. ही घटना काल सकाळी ७.३० वाजता मडगाव नगरपालिका चौकाजवळ घडली. दोघेही पती-पत्नी सायकलने निघाले होते. त्याचवेळी मागून येणार्‍या बसने जोरदार धडक दिल्याने ती खाली पडली व बसखाली चिरडली. पती-पत्नी मजूर असून, मूळ बिहार येथील आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बसचालक ग्रेगरी फ्रांसिस्क परेरा याला अटक केली आहे.