बलात्कार प्रकरणी संशयिताला अटक

0
15

एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली वेर्णा पोलिसांनी २९ वर्षीय संशयित इसमाला अटक केली. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ आसाम आणि सध्या वेळसाव येथे राहणार्‍या संशयिताला रविवारी रात्री उशिरा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. वेळसाव येथील सदर अल्पवयीन मुलीला पालकांनी तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेले होते. त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात येताच मुलीच्या पालकांनी वेर्णा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासाअंती वेर्णा पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.