फर्मागुडी येथे आतिश हॉटेलजवळ हमरस्त्यावर काल दुपारी ३ वाजता ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या टकरीत मोटरसायकल चालक सदानंद गावडे (३०) मरण पावला. इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जी.ए.०४ टी ३७८२ क्रमांकाचा ट्रक फर्मागुडीहून फोंडामार्गे येत होता तर जी.ए. ५ ए ९४५३ क्रमांकाच्या मोटरसायकलने सदानंद गावडे हा नागेशीला जात होता. हमरस्त्यावर दोन्ही वाहनांची टक्कर झाल्याने हा अपघात घडला यात सदानंद गावडे मरण पावला. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.
दरम्यान, वरच्या बाजारात मारुती कारने तीन मोटरसायकली व एका मारुती कारला धडक दिली. या विचित्र अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले व वाहनांची हानी झाली.