पॅन-आधार लिंकसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

0
12

सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषणा केंद्र सरकारने केली असून, आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत जरी वाढवली असली, तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी त्यांचे आधार-पॅन अद्याप लिंक केलेले नाही त्यांना 1000 रुपये भरून ते लिंक करता येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून यावेळी आणखी मुदतवाढ मिळणार नाही, असेही म्हटले जात होते; परंतु, आता 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.