पीएफआयच्या सदस्यांची जामिनावर मुक्तता

0
4

पीएफआयच्या गोवा शाखेचे पदाधिकारी, नेते आणि सदस्यांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना काल उपजिल्हाधिकार्‍यांसमोर हजर करून नंतर त्यांची जामिनावर मुक्तता केली. यापुढे अशा देशविघातक कार्यात भाग घेणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. सासष्टी तालुक्यात पोलिसांनी पीएफआयच्या १२ सदस्यांना अटक केली होती.