पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची हत्या झाली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता. सैफुल्लाह याच्यावर पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा लष्कर ए तोयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तोयबा या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणे तसेच आर्थिक मदत पुरवणे हे त्याचे प्रमुख काम होते.
सैफुल्लाह याचा भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमध्ये मोठा सहभाग होता. रामपूर येथे 2001 साली झालेला रपीएफ कँपवरील हल्ला, 2006 साली झालेल्या नागपुरातील संघाच्या मुख्यालयावरील हल्ला, तसेच 2005 साली झालेल्या बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसवर झालेल्या हल्ल्याचा यात सहभाग होता.