Home बातम्या पर्वरीतील धिंगाण्याची न्यायालयीन चौकशी करा

पर्वरीतील धिंगाण्याची न्यायालयीन चौकशी करा

0

पर्वरीचे आमदार कारवाईची मागणी करीत असतानाही पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे स्थानिकांना हस्तक्षेप करावा लागला ही हास्यास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. नायजेरियन नागरिकांवर पोलीस कारवाई का करीत नाही, हे कळणे कठीण झाले असून पोलिसांना त्यांच्याकडून हप्ते मिळत असल्याच्या संशयास बळकटी मिळाल्याचे लॉरेन्स यांनी सांगितले.

विदेशी नागरिकांना पोलिसांची भीती वाटत नाही हे वरील प्रकारातून सिध्द झाले आहे. यापुढे गोव्यात सनबर्न किंवा अन्य महोत्सव होईल त्यावेळी अशाच दंगली पेटण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बेकायदेशीरपणे गोव्यात वास्तव्य करणार्‍या सर्व विदेशी नागरिकांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. किनारपट्टीवरील काही भाग त्यांच्या वसाहती बनल्या असून तेथे स्थानिकांना प्रवेश करणेही शक्य नसल्याचे ते म्हणाले. अमली पदार्थाच्या गैरव्यवहारातून टोळी युध्दे होत आहेत. नायजेरियन नागरिकाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी बैठकीत विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पक्षाने वरील प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे लॉरेन्स यांनी सांगितले.