राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आगमनाला चालना देण्यासाठी इनबाउंड टूर ऑपरेटर्स इन्सेंटिव्ह योजना, 2026 अधिसूचित केली आहे. या योजनेखाली नोंदणीकृत इनबाउंड टूर ऑपरेटर्सना दाबोळी किंवा मोपा विमानतळांवर उतरणाऱ्या प्रत्येक पात्र आंतरराष्ट्रीय चार्टर फ्लाइटसाठी 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. फ्लाइटमध्ये किमान 70 टक्के प्रवासी असणे आणि पर्यटकांचे किमान सात दिवस गोव्यात वास्तव्य अपेक्षित आहेत. या योजनेसाठी वार्षिक 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक ऑपरेटरसाठी 35 लाखांची मर्यादा असून, तीन वर्षे योजना सुरू राहणार आहे. या योजनेचे दरवर्षी वार्षिक पुनरावलोकन केले जाणार आहे.