आगीत शोरूममधील फर्निचर, वातानुकुलीत यंत्रणा, विजेचे केबल, रिबॉकचे रेडिमेड कपडे, पादत्राणे, बॅगा असा सुमारे ५० लाख रु.चा ऐवज खाक झाला. शोरूममधील वातानुकुलीत यंत्रणेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे आग्निशामक दलातील सूत्रानी सांगितले.
पणजीच्या अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळताच दोन बंब दुर्घटनास्थळी पाठवण्यात आले. दलाने दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. याकामी दलाचे अधिकारी बॉस्को फेर्रांव सब ऑफिसर आकिन फ्रान्सिस्को नामदेव परवार यांच्या मार्गदर्शनाखाली दलातील जवानानी आग आटोक्यात आणली.