Home बातम्या नुवे येथे युवकाचा भोसकून खून

नुवे येथे युवकाचा भोसकून खून

0

नुवे येथे पालवीर जार्दीनमध्ये कार्निवल नृत्याच्या वेळी वाद्यवृंदाचे प्रमुख मंजित फर्नांडिस (२०) असोळणा याची अज्ञात तरुणाने पोटात सुरा खुपसून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना परवा रात्री १०.३० वाजता झाली.

झेवियर याने कार्निवालनिमित्त नृत्यरजनीचे आयोजन केले होते व बरीच मंडळी जमली होती. नृत्याचे कार्यक्रम संपल्यानंतर लोक घरी परतले. तेव्हा मंजित फर्नांडिस आपल्या खिशातील घामाने भिजलेले कागदपत्र मोटरसायकलजवळ वाळवीत होता. इतक्यात एका गाडीतून एक तरुण उतरून मंजित जवळ गेला. संगीतवाद्याच्या ठेक्यावरून त्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी नकळत त्याने मंजितच्या पोटात तिक्ष्ण हत्याराने वार केला व गाडीत बसून फरारी झाला. त्या अज्ञात तरुणासोबत एक तरुणी आली होती.

तात्काळ तेथील तरुणांनी मंजितला हॉस्पिसियु इस्पितळमध्ये दाखल केले. पण रक्तस्त्राव चालूच राहिल्याने एका तासातच त्याचे निधन झाले. मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर वृत्त समजताच ते घटनास्थळी पोहचले. पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत. काल दिवसभर तपास करूनही खुन्याचा तपास लावण्यात अपयश आले.