हरमल पंचक्रोशी शालेय परिवारातर्फे शनिवार दि. ३१ हरमल पंचक्रोशी सभागृहात आयोजित केलेल्या ‘गौरव सोहळा’ कार्यक्रमात गौरवमूर्ती या नात्याने मंत्री प्रा. पार्सेकर बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत सौ. स्मिता पार्सेकर, पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. उदय गोवेकर, मुख्याध्यापिका सौ. शशिकला परब, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत नाईक, सचिव तथा पंच सदस्य द्वारकानाथ नाईक, खजिनदार गंगाराम गडेकर, सदस्य सुधीर नाईक, पूर्व विभागाचे पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष हरेश मयेकर, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष सौ. अर्चना खोर्जे, माध्यमिक विभागाचे अध्यक्ष देवानंद कुडव, उच्च माध्य. विभागाचे अध्यक्ष उमेश मालवणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी पंचायतमंत्री प्रा. पार्सेकर यांनी दीप प्रज्वलित करून सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पंचक्रोशीच्या विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या स्वागतगीताने गौरव सोहळ्याची सुरूवात झाली. शिक्षक एकनाथ शेटगांवकर, प्रदीप तोरस्कर, सौ. स्मिता परब, सौ. भाग्यश्री शेट्ये, अर्चना खोर्जे, हरेश मयेकर, देवानंद कुडव, उमेश मालवणकर, उदय गोवेकर, गंगाराम गडेकर आदींनी आपापल्या विभागातर्फे मंत्री प्रा. पार्सेकरांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी शालेय परिवारातर्फे मंत्री पार्सेकरांची दीपोत्सवाने ओवाळणी करून त्यांचा शाल, श्रीफळ व सरस्वतीची चांदीची मूर्ती तसेच पुष्पहार अर्पण करून गौरव करण्यात आला.