गोव्यात शंभर टक्के फोटो ओळखपत्रे वितरित केल्याने अन्य कोणताही दाखला मतदानाच्यावेळी ग्राह्य न धरण्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्यामुळेच मतदान स्लिप ओळखपत्र म्हणून वापरण्याची मुभा ठेवली आहे, असे नावती म्हणाले.
बीएलओतर्फे वरील स्लिप्स वितरित केल्या जातील. उमेदवारांना स्लिप्स वितरित करण्यास मान्यता दिली असली तरी कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे निवडणूक चिन्ह असलेली स्लिप्स मतदान केंद्रावर नेता येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. एखाद्या मतदाराला काही कारणावास्तव मतदार स्लिप्स उपलब्ध न झाल्यास प्रत्येक मतदान केंद्रावरील सुविधा केंद्रावर वरील स्लिप्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असेल. त्यामुळे मतदारांना कोणतीही अचडण होणार नाही, असे ते म्हणाले. दि. २९ पर्यंत स्लिप्स उपलब्ध न झाल्यास संबंधितांनी बीएलओ किंवा निर्वाचन अधिकार्यांशी संपर्क करावा, असे आवाहन निवडणूक अधिकार्यांनी केले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असलेल्या मतदारसंघात पोलीस बंदोबस्त वाढविण्याचा आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.