Home Featured निकालानंतर राज्यातील आपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

निकालानंतर राज्यातील आपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

0

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि आपचे राष्ट्रीय नेते मनीष सिसोदिया यांची कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणातून निर्दोष ठरवल्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे गोव्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल येथील पक्ष मुख्यालयात जल्लोषात स्वागत केले.
गोवा विधानसभेच्या 2022 च्या निवडणुकीसाठी आपने दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यातील पैशांचा वापर केल्याचा आरोप करून आपच्या नेत्यांची चौकशी करण्यात आली होती. गोवा विधानसभेत मद्य घोटाळ्यावरून आपच्या आमदारांवर टोमणे मारले गेले होते. तथापि, भाजपने मद्य घोटाळा प्रकरणाबाबत केलेले सर्व आरोप अखेर खोटे ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात सीबीआयला न्यायालयात एकही प्राथमिक पुरावा सादर करता आला नाही, असे आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.
भाजपने आमच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुरुंगात टाकले, तरीही एकही नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला नाही. न्यायालयाचा आदेश हा आपच्या प्रामाणिक राजकारणावर शिक्कामोर्तब करणारा आहे, असे आमदार क्रूझ सिल्वा यांनी सांगितले.