नायजेरियातील लागोस बंदरालगतच्या समुद्रात सिंगापूरस्थित कंपनीच्या ऑईल टँकरचे चाच्यांनी अपहरण केले असून २३ भारतीय खलाशांना ओलीस ठेवले आहे.
मंगळवारी रात्री सशस्त्र चाच्यांनी जहाजावर ताबा मिळविल्याचे इंटरनॅशनल मेरिटायम ब्यूरोने म्हटले आहे. चाच्यांनी जहाजावर कब्जा मिळविल्यानंतर सक्तीने जहाज खोल समुद्रात न्यायला लावले. याठिकाणी वारंवार जहाजांवर हल्ले होत असून त्यामुळे येथील व्यापार क्षेत्रास धोका निर्माण झाला आहे.