भाजपकडून निषेध
स्पेक्ट्रम वितरणसंबंधी मंत्रिगटाच्या अध्यक्षपदी काल गृहमंत्री पी. चिदंबरम यांची नियुक्ती करण्यात आली. यापदावर शरद पवार यांना नेमले होते मात्र वादाच्या शक्यतेमुळे त्यांनी पद सोडले होते. दरम्यान, भाजपने चिदंबरम यांच्या नियुक्तीचा तीव्र निषेध केला आहे.
या मंत्रिगटात एकूण सात सदस्य असतील. त्यात संरक्षण मंत्री ए. के. अँथनी, दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल, माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी, कायदा मंत्री सल्मान खुर्शिद, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री व्ही. नारायणसामी आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांचा समावेश असेल.
स्पेक्ट्रम परवान्यांच्या बोली लगावण्याकरिता बोलींसाठी मूळ किंमत निर्धारित करण्याचे काम हा मंत्रिगट करणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर १२२ स्पेक्ट्रम परवाने रद्द केले होते.