Home बातम्या दुचाकी चोरांची टोळी गजांआड

दुचाकी चोरांची टोळी गजांआड

0

विविध ठिकाणी दुचाक्या चोरणार्‍या तिघांच्या टोळीला मडगांव पोलिसानी अटक करून दोन दुचाक्या हस्तगत केल्या. दोघे मूळ उत्तर प्रदेश येथील तर एक आसामातील असून फोंडा येथील कदंबा बसस्थानकालगत राहतात. महमद नझीम अन्सारी (२१) व अमीर शब्बीर (२७) हे मूळ उत्तर प्रदेशातील तर पिंतू कपील तन्ती (२०) हा आसामातील आहे. पोलिसांनी एक डिचोली येथून व दुसरी मडगांव येथून चोरलेली दुचाकी हस्तगत केली. उपनिरीक्षक रवी देसाई यानी ही कारवाई केली.

दरम्यान, मडगाव येथील दुचाकी चोरी प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी घोगळ येथील अन्सारी नारंगी याला अटक करून एक यामाहा मोटरसायकल हस्तगत केली. चोरीची मोटरसायकल घेवून जाताना पोलिसांनी हटकले असता ती चोरीची असल्याचे दिसून आले.