आप सरकारची दुसरी घोषणा
मोफत पाण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीच्या आम आदमी सरकारने काल दिल्लीकरांना आणखी एक खुषखबर दिली. घरगुती वापरासाठी ४०० यूनिट्सपर्यंत वीजभाड्यात ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय काल घेण्यात आला. हे अनुदान सध्या केवळ तीन महिन्यांसाठी लागू केले जाईल.
काल झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वरील घोषणा केली. यामुळे पुढील तीन महिन्यांत ६१ कोटी रु. सरकारवर बोजा पडेल. सरकारच्या वरील निर्णयाचा २८ लाख ग्राहकांना लाभ मिळेल. दरम्यान, ऑडिट अहवाल आल्यानंतर ही सवलत तीन महिन्यांनंतर लागू ठेवण्याबाबत विचार होईल. दिल्लीत वीजपुरवठा करणार्या तीन खासगी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासाची तयारी सरकारने चालविली आहे. कंपन्यांकडून आज मते मागविली असून त्यानंतर याबाबत निर्णय होईल.