रमेश कुमार व रमेश राम हे ते दोघे कुविख्यात चोरटे असल्याचे ते म्हणाले.
चोरट्यांकडून सर्व दागिने हस्तगत करण्यात आलेले असले तरी अजून ५० हजार रु. रोख रक्कम मिळू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले. या चोरट्यांनी आणखीही काही घरफोड्या केल्या होत्या की काय त्याचा तपास केला जात आहे. अजून चोरट्यांची जबानी घेण्याचे काम चालू आहे.
चोरट्यांची ही टोळी ७ जून रोजी गोव्यात आली होती. नवी दिल्लितून रेल्वेने हे टोळके गोव्यात आले. एक दिवस त्यांचा मुक्काम मडगावी होता. नंतर ते पणजीला येऊन राहिले. मडगाव तसेच पणजीत ते ज्या हॉटेलात राहिले होते त्या हॉटेलवाल्यानी त्यांची ओळखपत्रे तपासून पाहिली होती की काय ती माहिती मिळवण्यात येत असल्याचे गावकर यांनी सांगितले. चोरट्यांची ओळखपत्रे तपासून पाहिली जात असल्याचेही ते म्हणाले. चारचाकी अथवा मोटारसायकली कोणतीही ओळखपत्रे न बघता भाड्यावर चालवण्यासाठी देणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गावकर यांनी दिला. दरम्यान, वरील चार चोरट्यांपैकी दोघेजण नवी दिल्लीतील ऑटो रिक्षावाले असल्याची माहितीही हाती आली असल्याचे गावकर यांनी सांगितले.