दोन्ही जिल्ह्यांत व्यापारी विभाग
नव्या उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुढील सप्टेंबर महिन्यापर्यंत उत्तर व दक्षिण गोव्यात व्यापारी विभागांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भंगार अड्ड्यांवर निर्बंध
पंचायत व नगरपालिका क्षेत्रातील लोकवस्तीत स्क्रॅप यार्ड्स उभारण्यावर बंदी घालण्यात येणार असून सध्या ती आहेत ती तेथून हलवून त्यांना लोकवस्तीपासून दूर जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. आयडीसील ज्या अधिकार्यांनी व पदाधिकार्यांनी आपल्या नातेवाईकाना भूखंड दिलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.
ओबीसी आरक्षण तत्वत: मान्य
ओबीसीना २७ टक्के आरक्षण देण्याची मागणी महादेव नाईक यांनी काल विधानसभेत तत्वत: मान्य केली. मात्र, जातींची जनगणना पूर्ण झाल्यानंतरच हे आरक्षण देण्यात येणार असल्याचे समाज कल्याण खात्यावरील मागण्यांना उत्तर देताना त्यांनी सांगितले. काही आमदारांनी तशी मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल वरील आश्वासन दिले.