Home बातम्या ड्रग्स, भू-माफियांची मुळे शोधून काढणार

ड्रग्स, भू-माफियांची मुळे शोधून काढणार

0

वरील घटनेनंतर एका वृत्त वाहिनीवरील चर्चेत फातोर्ड्याचे अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर केलेली टीका व आमदारांबद्दल उच्चारलेले अपशब्द याची बैठकीत गंभीर दखल घेण्यात आली.

आमदार सरदेसाई यांच्या २५ कोटी रुपये मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. गेली आठ वर्षे विदेशी नागरिक किनारी भागात वास्तव्य करीत आहेत. त्यास कॉंग्रेस सरकार पूर्ण जबाबदार असल्याचा आरोप आ. फळदेसाई यांनी केला.

आपल्या सरकारने म्हणजे पोलीस खात्याने परवा प्रभावीपणे काम करून वातावरण शांत करण्यास यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचा दावा फळदेसाई यांनी केला.

दोन तासात वातावरण शांत झालेले असतानाही संध्याकाळी ४ वाजता रास्ता रोको करून जनतेला वेठीस धरण्याची काम गरज होती, असा प्रश्‍न त्यांनी करून अप्रत्यक्षपणे तेथील आमदार रोहन खंवटे यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याची आपण मागणी करीत आहे काय? असा प्रश्‍न केला असता स्पष्टपणे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. ठराविक व्यक्तींना जबाबदार धरण्याचा विषय नाही, असे ते म्हणाले.

गेली आठ वर्षे अमली पदार्थ असो किंवा खाण प्रकरण असो आपला पक्ष आरोप करीत आहेत. संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल केले का जात नाही, असे विचारले असता, पुरावे नसताना गुन्हे दाखल करणे शक्य नसते, असे आ. नीलेश काब्राल यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सुकूर येथील जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही, असे काब्राल यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. विदेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे कुणालाही धाडस नव्हते, असे सांगून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ते केले आहे. पोलिसांनी ५४ नायजेरियन नागरिकांना अटक केल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.