राज्य सरकारच्या समाजकल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे (डीएसएसएस) सुमारे 13 हजार बोगस लाभार्थी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले असून, त्यांच्याकडून सुमारे 50 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी दिली.
समाजकल्याण खात्याने दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. या सर्वेक्षणामध्ये सुमारे 13 हजार बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. त्यात परप्रांतीय, पात्र नसलेले आणि मृत लाभार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या घराकडे जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. काही लाभार्थ्यांना नजरचुकीने मृत घोषित करून बँकेला कळविल्याचे आढळून आल्यास त्यांचे पूर्ण मानधन दिले जाणार आहे, असेही पंचवाडकर यांनी स्पष्ट केले.