Home बातम्या ठोकर मारून पळालेल्या चालकास अटक व सुटका

ठोकर मारून पळालेल्या चालकास अटक व सुटका

0

मांडवी पुलावर दि. १७ रोजी ठोकर मारून पळ काढलेल्या वाहनाला पोळे तपासणी नाक्यावर अडवून पोलिसांनी हेमंत सी. बंगळूर याला अटक केली. केए ०२ एबी ०३३१ या टेम्पो ट्रॅव्हलरने ठोकर दिल्याने बेती येथील दुचाकीस्वार देवेश चोपडेकर याचे निधन झाले होते.

अपघाताच्या दिवसापासून त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत होता. न्यायदंडाधिकार्‍यांनी त्याची जामिनावर सुटका केली.