Home बातम्या जुने गोवे येथे रानटी जनावरांचे मांस जप्त

जुने गोवे येथे रानटी जनावरांचे मांस जप्त

0

वन विभागाच्या एका पथकाने जुने गोवे येथे बारवर छापा टाकून रानटी जनावरांचे मांस जप्त केले व अटक केली.

काल पणजीच्या मोबाईल स्कॉटला आलेल्या तक्रारीनुसार स्कॉट अधिकारी व रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांच्या आदेशावरून एका पथकाने जुने गोवे येथील ब्रुनो बारची झडती घेतली असता आत प्लास्टिक पिशव्यांत भरून ठेवलेले रानडुकराचे मांस तसेच एक तण सांबर कातडी सोललेल्या अवस्थेत आढळले. याशिवाय बाजूच्या पडवीत मास कापण्यासाठी लाकडी ओंडका तसेच सुरा व तराजु आढळला.

रानटी जनावरांचे मास बाळगणे किंवा विकणे गुन्हा असल्याने मांस तसेच फ्रिज जप्त करण्यात आला व त्याला अटक झाली.