जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रकमध्ये खनिज माल

0
139

 

कोरोनासाठीच्या लॉकडाऊनमुळे सध्या परराज्यातून फक्त जीवनावश्यक वस्तू घेऊन येणार्‍या गाड्यांना तेवढा प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, काल जीवनावश्यक वस्तूंसाठीच्या ट्रकमधून गोव्यात खनिज माल आणल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. काल कर्नाटकातील हॉस्पेट येथून आलेल्या काही ट्रकांतून मेंगनीज (खनिज माल) आणल्याचे उघड झाले. ओळीने आलेल्या या ट्रकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा परवाना होता. त्यातील काही ट्रकांना फक्त साखर नेण्याचा परवाना होता असे तपासणी नाक्यावर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला आढळून आले.

तपासणी नाक्यावर कुणीही न अडवता या ट्रकांना जाऊ देण्यात आले. हा खनिज माल एका आघाडीच्या खनिज कंपनीचा असल्याचे दिसून आले.