जीनो एससी भक्कम स्थितीत

0
132

गोवा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत (तीन दिवसीय सामने) काल पहिल्या व शुभारंभी दिनी जीनो स्पोटर्‌‌स क्लबने धेंपो क्रिकेट क्लबविरुद्ध मजबूत स्थिती गाठली आहे. धेंपोचा डाव अवघ्या १७० धावांत संपवल्यानंतर जीनोने दिवसअखेर १ बाद ११६ धावा केल्या आहेत. पर्वरी येथील पीसीए मैदानावर हा सामना सुरु आहे. धेंपोकडून मुकुल कसाना याने सर्वाधिक ६६ धावा केल्या. १२२ चेंडूंचा सामना करताना त्याने ८ चौकार लगावले. जीनोतर्फे विजेश प्रभुदेसाई, हर्षद गडेकर, मोहित रेडकर व धीरज यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रथमेष गावस (नाबाद ५९, ९७ चेंडू, ९ चौकार) व नितीन सैनी (५४ धावा, ७२ चेंडू, ७ चौकार) यांनी जीनोला १०६ धावांची सलामी दिली.

संक्षिप्त धावफलक ः धेंपो सीसी पहिला डाव ५९.१ षटकांत सर्वबाद १७० (मुकुल कसाना ६६, सुयश प्रभुदेसाई २३, विनय चौधरी २९, शुभम देसाई १२, विजेश प्रभुदेसाई ४१-२, हर्षद गडेकर १७-२, धीरज यादव ५४-२, मोहित रेडकर २१-२, बलप्रीत चढ्ढा व विशंभर कहलोन प्रत्येकी १ बळी) वि. जीनो एससी पहिला डाव ३० षटकांत १ बाद ११६ (प्रथमेष गावस नाबाद ५९, नितीन सैनी ५४, समित मिश्रा २५-१)