जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी द्रोन पाडले

0
18

पाकिस्तानी सीमेतून भारतीय हद्दीत प्रवेश केलेले एक द्रोन रविवारी पहाटे सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये पाडले. या द्रोनला सात मॅग्नेटीक बॉम्ब आणि ग्रेनेड्स लावण्यात आले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करत हे ड्रोन खाली पाडले. कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तल्ली हरिया चक परिसरात द्रोनच्या हालचाली वाढल्या होत्या. यामुळे दररोज सकाळी पोलिसांचे एक पथक या भागात नियमितपणे पाठवले जात होते. काल रविवारी पहाटे सुरक्षा दलाच्या या पथकाने पाकिस्तानी सीमेतून एक द्रोन येत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी त्वरित द्रोनच्या दिशेने गोळीबार करत हे द्रोन खाली पाडले. या द्रोनसोबत सात चुंबकीय बॉम्ब आणि सात यूबीजीएल ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.