गेल्या सप्टेंबरमध्ये सत्र न्यायालयाने या चारही आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर केल्यानंतर सरकारपक्षाने या शिक्षेला दुजोरा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींच्या वतीनेही निरपराध असल्याचा दावा करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
‘निर्भया’ वर १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री फिरत्या बसमध्ये बलात्कार व भीषण अत्याचार करणारे आरोपी मुकेश (२६), अक्षय ठाकूर (२८), पवन गुप्ता (१९) आणि विनय शर्मा (२०) या चौघांच्या फाशीसंदर्भात कालपासून दैनंदिन सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले होते. काल ही फाशी कायम करण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंग (३४) याने तिहार तुरूंगात गेल्या वर्षी मार्च मध्ये आत्महत्या केली होती. एका अल्पवयीन आरोपीस दोषी धरून तीन वर्षे कारावासाची शिक्षा देऊन सुधारगृहात पाठवण्यात आलेले आहे.