Home बातम्या गोवा राखण मंचाकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

गोवा राखण मंचाकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

0
मुख्यमंत्री पोलीस संरक्षणात तेथे आले व ‘आजतक’ वृत्त वाहिनीच्या वार्तालापाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. काल संध्याकाळी वरील वृत्त वाहिनीने पर्रीकर यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्याचे ठरविल्याची माहिती मिळाल्याने ‘गोवा राखण मंच’चे काही कार्यकर्ते पाटो येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या परिसरात संध्याकाळी ४ वाजताच जमा झाले होते.

काही कार्यकर्ते काळ्या रंगाचे टी शर्ट परिधान करून आले होते. चित्रीकरणाच्या स्थळी प्रवेश देण्यास आयोजकांनी मज्जाव केला होता.
गोवा राखण मंचचे कार्यकर्ते तेथे जमल्याने कला आणि संस्कृती खात्याच्या अधिकार्‍यांसमोरही पेच निर्माण झाला होता. त्यामुळे अधिकारी उशिरापर्यंत तेथेच होते.