Home बातम्या गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवानिमित्त भारत सरकारचे विशेष टपाल तिकीट

गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवानिमित्त भारत सरकारचे विशेष टपाल तिकीट

0

गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने येत्या १९ डिसेंबर रोजी टपाल खाते गोव्यावरील एक विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करणार असून सदर कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री सचिन पायलट उपस्थित राहणार आहेत. खासदार शांताराम नाईक यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

गोवा मुक्ती दिन राष्ट्रीय पातळीवर पाळण्यात यावा अशी मागणी आपण २३ मार्च २०११ रोजी राज्यसभेत केली होती, परंतु गोव्यानंतर पुडुचेरी, करायकल, यानम व माहे आदी भाग मुक्त झाल्याने तेथूनही अशा प्रकारची मागणी होऊ शकते, हे कारण देऊन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्याला नकार दिला आहे, अशी माहितीही खासदार शांताराम नाईक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.