गुजरातमध्ये निवडणुकीसाठी मोदींच्या प्रचारसभा सुरू

0
13

गुजरात विधानसभेसाठी डिसेंबर महिन्यात दोन टप्प्यांत मतदान होणार असून मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांना सुरूवात केलेली आहे. यानिमित्ताने एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी काल सकाळी सर्वप्रथम, सोमनाथ मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी वेरावळ शहरात सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी गुजरातच्या प्रत्येक विकासात भाजपचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. त्यानंतर मोदींनी धोराजी, अमरेली, बोताड येथे सभा घेतल्या. या सभानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरला परतले.

या जाहीर सभांत त्यांनी गुजराती अभिमान जपण्याचे आवाहन करत गुजरातची बदनामी करणार्‍यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबरला तर दुसर्‍या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेशचे निवडणूक निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहेत