Home बातम्या खेमलो सावंत यांचा साखळीत भाजपला पाठिंबा

खेमलो सावंत यांचा साखळीत भाजपला पाठिंबा

0

साखळी मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरून डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार प्रताप गावस यांच्यासमोर आव्हान उभे केलेले आमोणे येथील उद्योजक तथा कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व क्रियाशील कार्यकर्ते खेमलो सावंत यांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेऊन आपला पूर्ण पाठिंबा भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांना जाहीर केला आहे.

डॉ. प्रमोद सावंत यांच्या दुसर्‍या प्रचार फेरीला सुरुवात झाली असता कुडणे पेठवाडा येथे प्रचार चालू असताना खेमलो सावंत आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पेठवाड्यावर येऊन डॉ. प्रमोद सावंत यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते प्रचार कार्याला होते त्यांनी जल्लोेषात खेमलो सावंत यांचे स्वागत केले. यावेळी खेमलो सावंत यांनी सांगितले की, कॉंग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीचा कुणावरही वचक राहिला नाही. त्यामुळे कॉंग्रेस सरकारने आम आदमीला जाम करून ठेवले आहे. आम आदमीची सुटका करून त्यांना चांगले दिवस दाखवायचे असतील तर भाजपा शिवाय दुसरा पर्याय नाही.