मूळ झारखंड येथील सुलेमान बर्ना तिग्गा (३२) या खलाशाचा पहाटे पाच वाजता खोल समुद्रात बुडून मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, काल पहाटे नेहमीप्रमाणे फ्रान्सिस्को वाझ यांच्या मच्छीमारी ट्रॉलरवर सुलेमान मासेमारीसाठी गेला होता. पाण्यात जाळे टाकताना सुलेमानचा पाय जाळ्यात अडकल्याने जाळ्याबरोबर तोही पाण्यात ओढला गेला.
कोणाच्या लक्षात येण्यापूर्वी तो बुडून मरण पावला. इतर खलाशांनी त्याला वर काढले असता तो मृत झाल्याचे आढळले. मृतदेह घेऊन मालीम येथे ट्रॉलर पोहोचला असता पर्वरी पोलीस ठाण्यावर खबर देण्यात आली. उपनिरीक्षक श्रीकांत पेडणेकर यांनी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला.