कोलव्यात 7 सायबर गुन्हेगारांना हैदराबाद पोलिसांकडून अटक

0
3

दिल्लीस्थित 7 सायबर गुन्हेगारांना हैदराबाद पोलिसांनी काल कोलवा येथील एका भाड्याच्या बंगल्यातून अटक केली. या गुन्हेगारांनी कोलवा, सेर्नाभाटी येथील एक बंगला भाडेपट्टीवर घेतला होता व ते तेथे राहत होते.

या सायबर गुन्हेगारांनी हैदराबाद येथील ॲक्सिस बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून तब्बल 50 लाख रुपये लंपास केल्याने हैद्राबाद पोलीस या भामट्यांच्या शोधात होते. हैदाबादच्या सायबर गुन्हे विभागातील पोलिसांनी सेर्नाभाटी कोलवा येथील ‘लाईट्स नेस्ट’ या बंगल्यावर छाप्पा मारुन या सायबर भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. हे सातही आरोपी मंगळवारी गोव्यात आले होते. हा छापा यशस्वी करण्यासाठी कोलवा पोलिसांनी हैदराबाद सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांना सहकार्य केले. या गुन्ह्याप्रकरणी हैदराबाद सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी देशातील अन्य काही भागांतही छापे मारले होते.