Home बातम्या कॉंग्रेस, भाजपच्या पराभवासाठी ११ पक्ष एकत्र लढणार

कॉंग्रेस, भाजपच्या पराभवासाठी ११ पक्ष एकत्र लढणार

0
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, केंद्रात भाजप व कॉंग्रेस प्रणित सरकारला पर्याय तयार करण्यासाठी या पक्षांनी येती लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याचे ठरवले आहे.
प्रत्येक पक्ष आपापल्या राज्यांत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल व राष्ट्रीय स्तरावर सर्व एकत्र येतील, असे करात म्हणाले.

आसाम गण परिषद व बिजू जनता दलाचे नेते कालच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी त्याबाबत अगोदर कल्पना दिली होती, असे करात म्हणाले.
कॉंग्रेस प्रणित यूपीए सरकारचा कारभार अनागोंदी होता, त्यातून प्रचंड भ्रष्टाचार, महागाई झाली. शेतकर्‍यांच्या वाट्याला घोर निराशा आली.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे प्रत्येक निधर्मी विचाराच्या व्यक्तीसमोर असलेले आव्हान असल्याचे करात म्हणाले. भाजप व संघाचा अजेंडा जातीयवादी असल्याचा ते म्हणाले.  भाजपच्या नीतीही कॉंग्रेसपेक्षा विशेष वेगळ्या नसल्याचे करात म्हणाले. रालोआ राजवट असलेल्या राज्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी अकराही पक्षांच्या नेत्यांनी एक संयुक्त घोषणापत्रात आम्ही लोकशाहीवादी, निधर्मी, लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन पुढे जाणार असल्याचे म्हटले. जनता दल – संयुक्तचे अध्यक्ष शरद यादव म्हणाले की, ही ‘पहिली आघाडी’ आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीष कुमार यांनी निवडणुकीनंतर भाजपशी कोणत्याही परिस्थितीत युती केली जाणार नसल्याचे नमूद केले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी आघाडीत आणखी पक्ष सहभागी होतील, असे सांगितले.
या पक्षांमध्ये समाजवादी पार्टी, अण्णाद्रमुक, जनता दल – संयुक्त, जनता दल – निधर्मी, चार डावे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, रेव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी, फॉर्वर्ड ब्लॉक) पक्ष, यांचा समावेश आहे.