कॉंग्रेस पक्ष ही भाजपची बी टीम ः आपची टीका

0
7

कॉंग्रेस पक्ष हा भाजपची बी टीम आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक राहुल म्हांबरे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेस पक्षाला मतदान म्हणजेच भाजपला मतदान होणार आहे. मागील पाच वर्षांत कॉंग्रेसच्या १५ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून राज्य कारभार हाताळला आहे.

आगामी निवडणुकीत भाजपने आपल्या काही इच्छुक उमेदवारांना कॉग्रेसमध्ये पाठवून निवडणूक रिंगणात उभे केले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा म्हांबरे यांनी केला. आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी उपेंद्र चंद्रू गावकर यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती यावेळी म्हांबरे यांनी दिली.