Home बातम्या केप्यात टिप्परने पाच मोटरसायकल्स चिरडल्या

केप्यात टिप्परने पाच मोटरसायकल्स चिरडल्या

0

एकजण जखमी

आमोणा केपे येथे एका वळणावर चालकाचा ताबा गेल्यानंतर टिप्परखाली पाच मोटरसायकल्स, एक सायकल चिरडली गेली. एका दुधाच्या गाड्याचाही चुराडा झाला. या घटनेत अवेडे केपे येथील मिंगेल मोरायश (६१) जखमी झाला असून त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल दुपारी २.३० वा.च्या सुमारास घडली.

स्टेअरिंग लॉक झाल्याने आपला ट्रकवरील ताबा गेला असे चालक उत्कर्ष दामोदर नाईक यांनी सांगितले. ट्रक कट्टा येथे जात होता. मोटरसायकल्स रस्त्याच्या बाजूला उभ्या करून ठेवल्या होत्या. त्या चिरडल्या गेल्या. दरम्यान, याचवेळी श्री. मिंगेल आपली स्कूटर न्यायला आले होते ते जखमी झाले. टिप्परची धडक बसून दूधाचा गाडाही उलथून पडला. केप्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर अधिक तपास करीत आहेत.