काणकोणसारख्या ग्रामीण भागांतही चिमण्यांचे दर्शन दुर्मिळ
काणकोण तालुक्यातील विविध भागांत दिवसभर ऐकू येणारा चिमण्यांचा चिवचिवाट आता फारच कमी झाला आहे. जुन्या वास्तू मोडून सर्वत्र नूतनीकरण झाले असल्याने चिऊताईंना राहायला जागा उरली नसल्यानेच त्या कदाचित आता गाव सोडून जात आहे का असा प्रश्न पडतो.
शहरीकरण, वैज्ञानिक प्रगतीचा प्रसार, झाडांची कत्तल, सिमेंट कॉंक्रिटच्या नव्या इमारती, जंगलाचा र्हास या सार्यांचा परिणाम चिमण्यांवर होत आहे. मडगाव, पणजीसारख्या शहरांबरोबरच काणकोण तालुक्यातील ग्रामीण भागांतूनही त्या आता नाहीशा होऊ लागल्या आहेत. यामुळे यापुढच्या काळात मुलांना केवळ पुस्तकातील चिमण्यांचे छायाचित्र पाहावे लागणार आहे.
एका वयोवृद्ध महिलेने दिलेल्या माहिनीनुसार पूर्वी अगदी घरात अडगळीच्या ठिकाणी चिमण्या घरटे बांधायच्या आता मात्र चिमण्या दिसणेही दुरास्पत बनत चालले आहे.
दरम्यान, शेतीत पिकांवर वापरली जाणारी किटकनाशके हेही चिमण्या कमी होण्यामागील एक कारण असू शकते. किटकनाशके फवारलेले दाणे खाल्यानंतर विषबाधा होऊन चिमण्या दगावत असल्याचे काही सांगतात.