किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रिपद काढल

0
2

मोदी सरकारने मंत्रिमंडळ रचनेत मोठा बदल केला आहे. त्यानुसार किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदे मंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडे भू-विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. कायदे मंत्रिपदावर रिजिजू यांच्या जागेवर भाजप नेते अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये रविशंकर प्रसाद यांच्या जागेवर किरेन रिजिजू यांची केंद्रीय कायदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती.