कालवी पुलाचे उद्घाटन येत्या रविवार दि. १३ रोजी संध्या. ६.३० वा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभावेळी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, उपसभापती अनंत शेट, आमदार ग्लेन टिकलो व डॉ. प्रमोद सावंत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
४९१ मीटर लांब व १३ मीटर रुंदी असलेल्या या पुलासाठी ५४.८४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.