Home बातम्या कारोणा बस दुर्घटनेची न्यायालयाकडून स्वेच्छा दखल

कारोणा बस दुर्घटनेची न्यायालयाकडून स्वेच्छा दखल

0

या दुर्दैवी अपघातात सहाजणांचा बळी गेला होता. या प्रकरणी बस चालकालाही पोलिसांनी अटक करून पाच दिवसांच्या रिमांडवर कोठडीत पाठविले आहे. ब्रेक निकामी झाल्यानेच वरील अपघात घडल्याचा दावा चालक करीत आहे.

राज्याच्या अनेक मार्गांवरील काही खासगी बसगाड्यांवरील चालक निष्काळजीपणे वाहने हाकत असतात, अपघात होण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज प्रवासी व्यक्त करीत आहेत. प्रवासी मिळविण्यासाठीच्या स्पर्धेमुळेच अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कारोणा येथील बस अपघाताची न्यायालयाने घेतलेली स्वेच्छा दखल महत्त्वाची ठरली आहे.

४३ बसेसवर कारवाई

दरम्यान, कारोणा दुर्घटनेनंतर वाहतूक खात्याने बसेसच्या तपासणीस सुरूवात केल्याचे दिसत आहे. काल अनेक बसेसचे हँड ब्रेक्स तपासण्यात आले. सुमारे ४३ बसेसवर कालच्या दिवशी कारवाई करण्यात आली.