कला अकादमीच्या कामात भ्रष्टाचार नाही ः गावडे

0
20

कला अकादमी इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे काल कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला गोवा ङ्गॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.

अकादमीच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा अंदाज खर्च किती होता असा प्रश्‍न सरदेसाई यांनी काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला विचारला होता. यावेळी सरदेसाई यांनी निविदा न काढताच सरकारने हे काम टॅकटॉन बिल्डकॉन प्रा. लिमिटेड ह्या कंपनीला कसे काय दिले असा प्रश्‍न करत सरकारने य्या कामासाठी एका सल्लागाराचीही नेमणूक करायला हवी होती, असे सरदेसाई म्हणाले. यावेळी उत्तर देताना मंत्री गावडे यांनी कला अकादमी इमारतीच्या नुतनीकरणासाठी अंदाजे खर्च हा ३९ कोटी ६३ लाख रू. एवढा होता. या कामाचे कंत्राट ज्या कंपनीला दिले आहे त्या टॅकटॉन बिल्डकॉन प्रा. लिमिटेड या कंपनीची निवड सार्वजनिक बांधकाम खात्याने केली होती, अशी माहितीही दिली. यावेळी सरदेसाई यांनी, या कामासाठीचा आदेश देताना ‘सीपीडब्ल्यू मेन्युएल’चा भंग करण्यात आला असल्याचा आरोप केला. ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कला अकादमीच्या इमारतीवर ङ्गक्त ४ कोटी रू. एवढा खर्च आला होता. आणि आता त्याच इमारतीच्या नुतनीकरणावर सरकारने तब्बल ५६ कोटी रू. एवढा खर्च आलेला असून यात भ्रष्टाचार असून त्याची चौकशी केली जावी अशी मागणी केली.यावेळी बोलताना नुतनीकरणावर ५६ कोटी नव्हे तर ३९ कोटी रू. एवढा खर्च आला आहे. १८% जीएसटी वगैरे धरून हा खर्च ४९ कोटींवर गेल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.