Home बातम्या कर्नाटकात बंदमुळे जनजीवन ठप्प

कर्नाटकात बंदमुळे जनजीवन ठप्प

0

कावेरी नदीचे पाणी तामीळनाडूस देण्यास विरोध करून विविध कन्नड संघटनांनी काल पुकारलेल्या कर्नाटक बंदमुळे त्या राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. म्हैसूरमधील ‘विप्रो’ च्या कार्यालयाची नासधूस करण्याचाही प्रयत्न काही आंदोलकांनी केला.

कर्नाटकमधील बसवाहतुकीबरोबरच रिक्षा, टॅक्सीही बंद राहिल्याने प्रवाशांची फारच गैरसोय झाली. राज्यातील पेट्रोल पंपही बंद होते. कन्नड चित्रपट उद्योगही या बंदमध्ये सामील झाला होता. पुनीत राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांनी धरण्यात भाग घेतला. शाळा, कार्यालये याबरोबरच चित्रपटगृहेदेखील काल बंद होती. केबल टीव्ही ऑपरेटरांनी बातम्यांच्या वाहिन्या वगळता इतर सर्व वाहिन्यांचे कार्यक्रमही काल प्रक्षेपित केले नाहीत.