ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ९२६ कोरोना बाधित, ३ बळी

0
7

राज्यात ऑगस्ट महिन्यात नवीन कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सात दिवसात नवीन ९२६ कोरोना बाधित आढळून आले असून ३ कोरोना बळींची नोंद झाली आहे.

जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोना सक्रिय संख्या ७२९ वर पोहोचली होती. आता, पुन्हा एकदा कोरोना सक्रिय रुग्ण संख्या ९२६ वर पोहोचली आहे. या महिन्याच्या सात दिवसांत ३ कोरोना बळींची नोंद झाली आहे. मागील जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता, ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

चोवीस तासांत नवे ९४ बाधित
राज्यात चोवीस तासात नवीन ९४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या ९११ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३९५५ एवढी आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १०.०१ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ९३९ जणांचे स्वॅबे तपासण्यात आले. नवीन एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेला नाही.

आणखी ७६ जण कोरोनामुक्त
चोवीस तासांत आणखी ७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के आहे.

ऑगस्टमधील रुग्ण
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत ९२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दि. १ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या स्वॅब तपासणीत ८५ रुग्ण,दि. २ ऑगस्ट रोजी १६३ बाधित, दि. ३ रोजी १४६, दि. ४ रोजी १३८, दि. ५ रोजी १५६, दि. ६ रोजी १४४ तर काल दि. ७ रोजी ९४ असे सात दिवसांत एकूण ९२६ कोरोनाबाधित सापडले आहेत.