एका कोरोना बळीसह नव्या ११२ रुग्णांची नोंद

0
13

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी एका कोरोनाबाधिताचा बळी गेला असून, नवीन ११२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९५१ झाली आहे. तसेच, सक्रिय रुग्णसंख्या ७१३ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ८.४४ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १३२६ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यातील ११२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. चोवीस तासांत तीन रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तसेच आणखी १०५ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१५ टक्के एवढे आहे.