आता १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बनवता येणार मतदार ओळखपत्र

0
14

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता १८ वर्ष पूर्ण होण्याची गरज नाही; कारण आता १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येणार आहे. तसेच वर्षातून चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच हा निर्णय जाहीर केला. १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर इच्छुकांना मतदान यादीत नाव नोंदणी करता येईल; पण १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मतदानाचा अधिकार मिळणार आहे.