उसगाव-तिस्क येथील सेंट्रल इस्पितळाच्या स्टोअररूममध्ये ठेवलेले सामान चोरीस गेल्याची तक्रार विराज खांडेपारकर यांनी फोंडा पोलीस स्टेशनवर नोंदवली आहे.
सामानाची किंमत जवळ जवळ १ लाख ९८ हजार इतकी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष माहिती मिळू शकली नाही. या चोरीप्रकरणी फोंडा पोलीस तपास करीत आहेत.